Tuesday, February 10, 2009

आसुसलेला जीव

माझी आशा वेडी होती
मृगजळा मागे धांव
तहानलेला राहीला
आसुसलेला रे जीव

वेडी आशा वेडे मन
त्याची धांव कुंपणाशी
केला कितीही आकांत
तुजपाशी ना पोंचशी !

तुझ्या माझ्यात अंतर
कधी ते कमी होणार?
जीव होता लावलास
पाझर ना फुटणार ?

नको असा अंत पाहू
नाही राहीले रे त्राण
घे एकदाच जवळ
जाण्य़ापुर्वी हे रे प्राण !

सुरेश पेठे
०९फेब्रु०९

No comments: