Tuesday, February 17, 2009

मिळाला एकच धडा


आता न वाटे कुणाचा
जरासा ही राग लोभ
मनाची तयारी होय
पुर्वीसारखा न क्षोभ
..
कुणा धूप का घाला
कुणाची कराची पर्वा
कोणी कुणाचेही नाही
आपणच सर्वे सर्वा
..
जगी नित्य जन्म घेती
लाखो करोडोने जीव
पोसण्यास बसलाय
तो सदाचाच आजीव
..
पापपुण्यांची तो त्यांच्या
हिशोब सदा राखतो
काळजी उगा वहावी ?
शिल्लक किती ठेवितो
..
मनोमनी अपेक्षांचे
उगाच वाहतो ओझे
उगाच मनी ठेवितो
हे माझेच, ते ही माझे !
..
वाट लागे विश्वासाची
विश्वास कां ठेवायचा
घात पात घात पात
आकांत च करायचा !
..
जगावे ही मुक्तपणे
इथे यावे मुक्ततेने
सदा सर्वच समयी
रहावे विरक्ततेने
..
जगी येउनि आम्हासी
मिळाला एकच धडा
यायचे आणि जायचे
नागडा अन उघडा !



..
सुरेश पेठे
१७फेब्रु०९

No comments: