Wednesday, August 17, 2011
एकमेव निर्धार !
तुझे हे, अजब नव्हे सरकार ?
मनमोहना, असाच का रे, अधांतरी दरबार ॥ धृ ॥
सवे घेउनि भ्रष्टाचारी, कधीच ना त्यां आवरी !
भोळी भाबडी जनता इथली तरी करि जयकार ॥ १ ॥
कसाब आहे इथे जांवई, रोजच मिळे त्यास मलाई
भुकी माणसे बघती तुजकडे मिळेल का आधार ॥ २ ॥
भ्रष्ट भ्रष्ट जे जे असती, पंक्तीला ते तुझ्याच बसती
एक सूरही ’ विरोधात ’ त्या खपवून नाही घेणार ॥ ३ ॥
म्हणे आपुले लोकशाहीचे, सरकार इथे आहे जनतेचे
भ्रष्टाचाराचे रूप नव नवे, दाखवीशीस दशावतार ॥ ४ ॥
जनता इथली मोताद अन्नास, हात लाविशी तरी अण्णास
पापाचे गड्या भरले घडे, आता शीघ्र हो पायउतार ॥ ५ ॥
असलास कितीही निगरगट्ट , पेटली जनता करी हट्ट
मारीत रट्टा, पुरता गाडू , केलाय एकमेव निर्धार ॥ ६ ॥
सुरेश पेठे
१७ ऑगस्ट २०११
Wednesday, August 10, 2011
न्या येथून !
तुज दशदिशा
उरे मज काय ?
रे चरण द्वय
देवा तुझे
केलास उशीर
जरी आजवरी
तृप्त झालॊ हरी
तुझ्या ठायी !
तुझ्याच कृपेने
पोचे इथवर
ही माझी स्थावर
मालमत्ता !
भेटूनि पावलो
हे जगदिश्वरा
आता करा त्वरा
न्या येथून !
सुरेश पेठे
११ ऑगस्ट २०११
Subscribe to:
Posts (Atom)