Sunday, January 25, 2009

नको ओझे जाताना !


नको ओझे जाताना !

आज त्या घटनेला महिना झाला असेल 
कोण जाणे वर्ष ही उलटेल   
पुढील वर्षे मोजली तरी जातील का ?

कोण्या एका क्षणी, कोणी एक भेटते, हृदयी बैसते !
काहीतरी फसते, हृदय रिकामे हॊते !
खरंच?  हृदय रिकामे हॊते ....पोकळी करून......की घर करून ?

पोकळी कशाला म्हणतात?...... म्हणजे मोकळी जागा ?
कुठे असते ती पोकळी की मोकळी ?  हृदयात......मनात ....?

तसं तर आयुष्य हीच एक मोठ्ठी पोकळी, एकदम आगळी !
काय काय भरले आहे त्यात ? काय रहाते काय जाते ?.....

भरते म्हणजे तरी काय ? वस्तू आहे दाखवायला ?
वेळ कुणाला बघायला? जो तो आपल्याच धुंदीत, बेहोषीत !....

कधीतरी ... होते भेटणे ! वाटते भरले सगळे जणूं !
माववायला नसे जागा एकही आता अणू- रेणू !

क्षण एक पुरे पण त्याला..... रिता व्हायला !
वेळ नसे विचार ही करण्या !

आता ?...

पण नाही ही तर ’ त्याची ’ योजना ! उगाचंच कशाला कमर वांकवायला ?
नको ओझे जाताना !

सुरेश पेठे
२६जाने०९






 



No comments: