Sunday, January 18, 2009

मी कोण ? आहेस कसा ?



स्वत:ला विचारले मी , मी कोण ? आहेस कसा ?
उत्तर नाहीच आले , ऐकल्या टाळ्या व हंश्या

मी तर बावळटसा , खिजगणतीत कसा ?
कुत्सितसे पाहूनच , पळला धूम ससा

सागराला विचारले , कुठे आहे रे किनारा ?
खळाळतच म्हणतो , तुम्ही प्रथम मला दिसा !

आकाशी सुध्दा नगण्य , शोधे अग्रगण्य NASA
विचारतॊ कोण तुम्हा , कुठे असा किवा नसा !

भिकारीही पळतोय , पाहून रिकामा खिसा
तुम्हा कुठे कशी जागा , कसे म्हणतील बसा ?

कोणासही काही नाही , तुम्ही रडा भेका रुसा
बळी तोच कान पिळी , नियम जगाचा असा

तू तर रे क:पदार्थ , कोपऱ्यातच ना बसा
मी निरोप घेण्या आलो , कोणा वेळ इवलासा ?

'तू' तरी यावेस ना ? तू ही घेतलास वसा !
उमटत नाही ठसा , त्यासी न्याय जगी खासा !!

सुरेश पेठे
३१ डिसेंबर २००८

No comments: