Friday, June 5, 2009

डोकावणार आहे ! ( गझल )


वेगा सवे मनाच्या मी धावणार आहे
जाते कुठे कुठे ते मी पाहणार आहे

वेगात धावलो मी पाडाल का मलाही ?
काही मला तरीही ना लागणार आहे

लागावया मलाही, घालाल पाय मध्ये
पायात दोन ही बेड्या ठोकणार आहे

मार्गात धावणाऱ्या श्वानास काय पाहू
श्वानास त्या सर्वथा मी चावणार आहे ?

पाहू जरी कुठे, काही दीसणार नाही
माझ्यामनी मनाच्या डोकावणार आहे

सुरेश पेठे
५ जुन ०९

( वरील मतला , गजल परिचयाच्या दिवशी दिला होता पण गझल आज पुरी होतेय असे वाटते श्री भूषणजी व श्री अजय जींनी मान्य केली तर !)

1 comment:

Sampada Mhalagi said...

ही पण कविता मस्त. तुमच्या कवितेवरून हे सुचलं.

धावून ऊर फुटला तरी श्रमलो ना मुळी मी,
आक्रांदण्यास येथे वेळ कुणा आहे