Monday, June 8, 2009

तूं तरीही ! ( गझल )

ओळीखले ?नव्हते, बालीश तूं तरीही
आलो नजीक तेव्हा गेलीस तूं तरीहि
.
जाशील तूं कधीही, चिंतेत रात गेली
ना एकरूप झालो, होतीस तूं तरीही
.
सांगून जावयाचे होतेस तूं मलाही
काहीच का नसे म्हणालीस तूं तरीही
.
आळीव राग मी रे ऐकावयास येतो
ऐकू न ये असे ? गाईलीस तूं तरीही
.
माझ्या मनात राही कांटा सले मलाही
चालेलना मनी राहीलीस तूं तरीही
.


सुरेश पेठे
८जून०९
[ ह्यातील दुसरा शेर श्री अरविंदजीं नी दिलेला आहे. त्याला गुंफून ही गझल लिहीली आहे. ]

3 comments:

Ajinkya Navare said...

अतिशय सुंदर गझल आहे. मला खूप आवडली. सप्रेम नमस्कार! - अजिंक्य नवरे

Sampada Mhalagi said...

Khupch chhan kaka! mala khup awadali.

सुरेश पेठे said...

@ संपदा,

खरं तर गझल हा माझ्या साठी नवा प्रकार आहे. मध्यंतरी एक गझल कार्यशाळेत मी गेलॊ होतॊ ( माझ्या ऑर्कुट अल्बम मध्ये फोटॊ आहेत ). तेव्हा हा हाताळला खरा , पण अजून तितकासा पचनी पडला नाही !