तुज दशदिशा
उरे मज काय ?
रे चरण द्वय
देवा तुझे
केलास उशीर
जरी आजवरी
तृप्त झालॊ हरी
तुझ्या ठायी !
तुझ्याच कृपेने
पोचे इथवर
ही माझी स्थावर
मालमत्ता !
भेटूनि पावलो
हे जगदिश्वरा
आता करा त्वरा
न्या येथून !
सुरेश पेठे
११ ऑगस्ट २०११
येथे मी माझे कविता विश्व उघडे केले आहे
1 comment:
माझे मित्र श्रीयुत प्रमोद देव ह्यांनी माझी ही कविता स्वत: चाल लावून गायली त्याची ही लिंक
http://majhigani.blogspot.in/search/label/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A0%E0%A5%87
Post a Comment