Friday, November 27, 2009

शाप

शाप
वाहिलेली शब्द फुले
यातना ज्या पाहिलेल्या
जखमांची भळभळ
संवेदना जपलेल्या !

ज्योतीला लागता ज्योत
फिटे अंधाराचे जाळे
वारा आगीला लागता
सर्वस्वच ना, ती जाळे !

जिवंत आहे ? मेलेला ?
आगीतही लोळलेला
मरणाच्या दारातही
धर्मच नाही कळला !!

सुरेश पेठे
२८.११.०९

13 comments:

Vibes of Bharat said...

फार छान कविता आहे. मिलिंद

Anonymous said...

नमस्कार काका,
त्यादिवशी तुमची माझ्या कविता ही भींत पाहीली पण घाइअत वाचायची राहिली. आज आपल्या कविता वाचल्या ,पुर्ण नाही झाल्या .लवकरच पुर्ण वाचिल. मला आपली "मित्रत्वाची ऐशीतैशी ( ऑर्कुटवरच्या )" कविता
फ़ार आवडली.

अक्षय सावध.

वि.वि.-कॄपया प्रतिक्रिसाठी wordpress वाल्यांना पर्याय खुला करुन द्यावा .

सुरेश पेठे said...

मिलींद जी
माझी कविता आवडली ह्यातच धन्यता पावलो. माझ्या इतर कविता वाचून कश्या वाटल्यात जरूर कळवा !
आपल्या कमेंटला उत्तर द्यायला झालेल्या उशीरा बद्दल क्षमस्व!

सुरेश पेठे said...

अक्षया !
तुझी प्रतिक्रिया वाचून आनंद झाला !तू खाली दिलेली विनंती तर कळली पण तो पर्याय कसा खुला करायचा ह्याबद्दल मला विशेष माहीती नाही ती सांगशील तर मी जरूर करीन.
बाकीच्या कवितांवरील तुझ्या प्रतिक्रियांची वाट पहातो आहे.

Anonymous said...

आपल्या फ़ेब्रुवारीतील कविता वाचल्या सुरेख लिहल्यात. खास करुन "मिळाला एकच धडा" फ़ार आवडली.

मागे आपल्याला केलेल्या विंनती बद्दल- लिहतांना wordpress वाल्यानां सरळ लिहता येते.OpenID मधून. इथे बघा.- http://bit.ly/6lo0UK
.तो पर्याय widgets मधून सुरु करा. मला blogspot मध्ये तो कुठे आहे ,ते माहीत नाही.पण शोधल्यास सापडेल.

सुरेश पेठे said...

अक्षय, तुझ्या कॉमेंट्स तर इथे येत आहेत. तू काय म्हटले आहेस ते मला अजूनही कळले नाही.

Anonymous said...

काका, मी येथे gmail चा id वापरुन प्रतिक्रिया देत आहे. Wordpress चा पर्याय नसला तरी चालेल.ते असु द्या.मी असाच gmail id वापरुन प्रतिक्रिया देइल.

सुरेश पेठे said...

OK Akshay !

Anuja said...

नमस्कार काका मी अनुक्षरे ची अनुजा,
माझी प्रतिक्रिया अनुजा नावाने येईल म्हणून वरील खुलासा केला. कविता वाचल्या, मनास भावल्या. नंतर सगळ्या निवांतपणे वाचीन. कळवीन.

HAREKRISHNAJI said...

सुंदर

सुरेश पेठे said...

हरेकृष्णजी,
प्रतिक्रियेबद्दल आभार

सुलभा said...

सुन्दर कविता आहेत हो काका.

सुरेश पेठे said...

सुलभा,
प्रतिक्रियेबद्दल आभार