Wednesday, May 27, 2009

पोरका ?


मी अबोल जरी, जन तरी बोल बोली
म्हणती ’रूपाचा तोरा’ मिरवित चाली

दुर्लक्षित करते, कोणीही बोलो काही
मी माझ्यात मजला फिकीर त्यांची नाही !

कां लागू तोंडी, दुतोंडी, काय मज कमी ?
माझं बाळ जवळी, हीच मजला हमी

मी माझ्या बाळात मजला न पर्वा काही
गोड गं छकुला त्यातंच रमून जाई !

******************************

काय ?गलका बाहेर होतो कोलाहल
म्हणे माय गेली, लेकरू मागे राहीलं

चर्र झाले हृदयी , ऐकोनी टाहो त्याचा
क्षणात गेले ,उचलोनी आणीले त्याला

रूप त्याचे काळे वा गोरे मज ना ठावे
छाती घेतला गोळा, हृदयी मनोभावे

माझा जसा, हाहि तसाच ना बाळ मज
आईविना पोरका कोण म्हणेल आज ?

मीहि ओली बाळंतीण फुटलेला पान्हा
आई जिवंत त्यांची ओटीत दोन कान्हा !

.
सुरेश पेठे
२७ मे ०९


 

2 comments:

Sampada Mhalagi said...

ही कविता आणि गोविंद-गोपाल एकदम हातात हात घालून बरोबर जातात.

सुरेश पेठे said...

ह्या दोन्ही कविता ’ काव्यांजली’ ह्या ऑर्कुट वरील कम्युनिटी वरील एका स्पर्धे साठी लिहील्या होत्या....एकच प्रसंग दोण वेगवेगळ्य़ा नजरेतून....
मी ही लिन्क्च देतो,
http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=41419010&tid=5337276371981435006&kw=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6+%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A0%E0%A5%87&na=1&nst=1