Wednesday, April 8, 2009

दृढावलेली नाती ?

दृढावलेली नाती ?
.
.
कधी कधी वाटतं, दृढावतात कधी नाती
कल्पना नसते कधी, असतात का तरी ती ?

पाखरा सारखी ती टपकतात अंगणात
वसतीला रहातात वळचणीला मनात

किलबिल नित्याची त्यांची सोबतीला हवीच
नात्यांची गुंफण वाढवलेली चालायचीच

इंद्र्धनुष्यांची रेलचेल मन मोहरते
खेळ नाना बघताना मन हरवून जाते

वाटे नाते घट्ट झाले, लागे त्याला घर घर
कशाला हवी नाती, लावून जाती हूर हूर ?

एके दिवशी होतो सन्नाटा, किलबिल गुल
घरटे जाई कोलमडून मनही मलुल !

पाखरावाणीच आलेली जेथल्या तेथे गेली
दृढावता दृढावता आली तशीच संपली !
सुरेश पेठे
०९एप्रिल०९

No comments: