Monday, January 19, 2009

मित्रत्वाची ऐशीतैशी ( ऑर्कुटवरच्या )



ऑर्कुट वरची तूं तरी खरी आहेस का गं ?
किती जरी घेतला शोध काढला होता मागं!
पोहोचूं का ठरल्या ठिकाणी? मला आता सांग
नाहीतर कोणी उगा, धरतील राग राग ! ..... ( १ )

कळले इथले सारे, एकूणच ना बेगडी
नातीगोतीं चा मामला एक्मेकां वर कडी
प्रोफाईल असते फक्त खोट्या माहीती साठी
कोणी करती कवतिक, म्हणे मित्रत्व जोडी ! ..... ( २ )

मित्रत्वाची ऐशीतैशी ते तरी खरे असशी ?
नातीगोतींचा गोतवळा काका ताई मावशी
नावां पासून साऱ्यांना वेगळाले घडविशी !
जो तो राहात असतो स्वत:लाच फसविशी ......... ( ३ )

"नात्यांची वीण घट्ट करुच नये.." अगदि
"कुठलच नात तितकसं जपुच नये.." कधी
कोणी तरी जेव्हा म्हटले, मनी ठसला हा मंत्र
एकदम पटला रे , कायम चा कानमंत्र ........ ( ४ )

सातासमुद्रा पल्याड बनला मित्र क्षणात
खरे ना ? आमचे होती तुकडे एका घणात !
कालपावेतो सगळे बागडले अंगणात
गैर-समजातून की हो झाली वाताहत ! ........ ( ५ )



( वरील चवथ्या कडव्यातील दोन ओळी सुप्रिया पाटिल च्या " मित्रत्व " ह्या कवितेतून घेत आहे.)

सुरेश पेठे
१९ जानेवारी २००९

No comments: