Monday, February 23, 2009

शोध मनाचा ! भाग एक

कुणा घ्यावयाचा शोध
दडलेय काय मना ?
शोधून शोधता नाही
ठाव घेऊ मिळेचना !
..
हे काम त्या कुंभाराचे
तुडवी माती पायाने
मातीत मन घडवी
मातीचेच अवधाने !
..
ही तर त्याची किमया
ज्याने घडविली काया
बहुविध मनी रूपे
पिसारा पसरी छाया !
..
पिसा सारखे हलके
तरंगते मन वेडे
वेडेपणातूनच रे
सर्वां रूपडे आवडे !
..
ह्या माती मधून बीज
मनी पेरतो सदैव
त्याचेच ना आहे शेत
उगवितो रे सुदैव !!
..
एक बीजा पोटी तरू
होईल त्यांचे अर्णव
करता करविता तो
ठेव मनी रे जाणीव !
..
विषयाची चिंता त्याला
अल्प ना कमतरता
मनी वसलेले आहे
प्रकटते उगाळिता !!
..
शोध घेण्यास उतरा
अंमळ ह्या चिखलात
चकीत होऊन जाल
सांपडे मन-मनात

शोध कितीही घेतला
अपूर्णतेने शापिला
शोध जारी तरी ठेवा
प्रयत्ना त्यासी अर्पिला

..
सुरेश पेठे
२३फेब्रु०९

Tuesday, February 17, 2009

मिळाला एकच धडा


आता न वाटे कुणाचा
जरासा ही राग लोभ
मनाची तयारी होय
पुर्वीसारखा न क्षोभ
..
कुणा धूप का घाला
कुणाची कराची पर्वा
कोणी कुणाचेही नाही
आपणच सर्वे सर्वा
..
जगी नित्य जन्म घेती
लाखो करोडोने जीव
पोसण्यास बसलाय
तो सदाचाच आजीव
..
पापपुण्यांची तो त्यांच्या
हिशोब सदा राखतो
काळजी उगा वहावी ?
शिल्लक किती ठेवितो
..
मनोमनी अपेक्षांचे
उगाच वाहतो ओझे
उगाच मनी ठेवितो
हे माझेच, ते ही माझे !
..
वाट लागे विश्वासाची
विश्वास कां ठेवायचा
घात पात घात पात
आकांत च करायचा !
..
जगावे ही मुक्तपणे
इथे यावे मुक्ततेने
सदा सर्वच समयी
रहावे विरक्ततेने
..
जगी येउनि आम्हासी
मिळाला एकच धडा
यायचे आणि जायचे
नागडा अन उघडा !



..
सुरेश पेठे
१७फेब्रु०९

प्रेम देऊ, प्रेम घेऊ करू बरसात


उत्साह वयात नसतो , असतो तो मनात
मनाने रहा उत्साही , येईल सारे हातात !
..
इंद्रधनुची कमान, रंग त्यात सात
उधळुनिया रंग , करू सर्वांवर मात
..
रंग भंगले कां ? उत्साह संपतात !
हात सुटला कां ? घेतला जो हातात
..
रंगात रंगताना, तुझी असो साथ
मार्ग क्रमणे आहे, घेउन हाती हात
..
मार्गी कोण आले, गुंतले की कोणात ?
खुलली न असता, कलिका सुकतात ?
..
मार्गात थांबणे नाही, होई जरी रात
माघार नाही जराही, जरी होय आकांत
..
माहीत नाही सारे, उगा झुंजतात
या मिळून सारे, करूयात रुजुवात
..
घेऊ शपथ, ना बाहेर काही आंत
निर्धास्त होऊद्या आजची सांजवात
..
आजच्या दिवशी करूया एक बात
प्रेम देऊ, प्रेम घेऊ करू बरसात

..
सुरेश पेठे
१४फेब्रु०९

Wednesday, February 11, 2009

कागदी शिक्षा !

कड्यावरून लोटली
भावमूलक अक्षरे
कोरडी की होती ओली ?
पसार महदंतरे !

ओलेत्या त्या भावनांना
कोरडी कागदी शिक्षा !
पुसली जरी गेलेली
कोण घालील भिक्षा

मातबरी ती शब्दांची
जपून ठेवा अक्षरांना ?
पायमल्ली हो जरीही
सांडून जाता भावना !!


सुरेश पेठे
१२फेब्रु०९

Tuesday, February 10, 2009

वाट पाहीन !

म्हणतोस वाट पहा
आहे माझी ना तयारी
पाहीन तुझी वाट रे
मला हवी तुझी यारी !

भारलेली चेतना ही
तुझ्यामुळे माझ्या अंगी
साथ तुझी असतांना
काय कमी अंतरंगी

माझ्या मनी तुझी आंस
धरूनिया तुझी कास
उरलेला माझा काळ
तुझ्या संगे घेईं श्वास !

वाट पाहीन रे तुझी
अगदी अंतापर्यंत
तेव्हा तरी असशील
साद घालीत हांसत !!

सुरेश पेठे
१०फेब्रु०९

आसुसलेला जीव

माझी आशा वेडी होती
मृगजळा मागे धांव
तहानलेला राहीला
आसुसलेला रे जीव

वेडी आशा वेडे मन
त्याची धांव कुंपणाशी
केला कितीही आकांत
तुजपाशी ना पोंचशी !

तुझ्या माझ्यात अंतर
कधी ते कमी होणार?
जीव होता लावलास
पाझर ना फुटणार ?

नको असा अंत पाहू
नाही राहीले रे त्राण
घे एकदाच जवळ
जाण्य़ापुर्वी हे रे प्राण !

सुरेश पेठे
०९फेब्रु०९