Wednesday, August 19, 2009

निसटलेले क्षण




निसटून गेलेले ते क्षण क्षण
येती अवचित कश्यास माहीत ?
जाता येता मन करती विषण्ण !
निसटून गेलेले ते क्षण क्षण

आठवणींचे जमती कण कण
लढविले गेले रण आणि रण
थेंबां सारखे पडती टपकन
निसटून गेलेले ते क्षण क्षण

जडावले मन मन, मण मण !
ठरविले आता नको आठवण
झुरळावाणी टाकूया झटकून ?
निसटून गेलेले ते क्षण क्षण

मनासारखे येती कधी जुळून ?
मनास जातील सारे वगळून
मनोमनी राहीलना उलझन !
निसटून गेलेले ते क्षण क्षण

सुरेश पेठे
२० ०८ २००९


5 comments:

प्रशांत said...

नमस्कार काका,
तुमच्या ब्लॉगबद्दल केसीबीसीवरून माहिती मिळाली.
मराठी ब्लॉगर्सचा "शब्दबंध" हा उपक्रम पहा.
http://marathi-e-sabha.blogspot.com

पुढल्या "शब्दबंध"मध्ये आपण सहभागी व्हाल अशी आशा आहे.

Vibes of Bharat said...

मा.पेठेकाका,
नमस्कार,
आपल्या कविता जाम आवडल्या. ब्लॉग या मध्यमाचा आपण किती समर्पक वापर करताय. माझ्या ब्लॉग वरच्या पुढ्च्या शिबिरात मी आपला ब्लॉग सर्वाना नक्की दाखवेन...मिलिंद आरोलकर

भानस said...

पेठेकाका ही कविता मला भावली. निसटून गेलेले ते क्षण क्षण ...आठवणींचे जमती कण कण...अगदी असेच झालेले...छानच.

prajakta said...

Namaste ajoba,
Khoop chaan ahet sarva kavita..
mi khoop lahan ahe yavar comment karanya sathi... pan khup aavadalya tumachya kavita mhanun lihit ahe.. :)

सुरेश पेठे said...

प्रतिक्रियांबद्दल सर्वांचेच आभार.
प्राजक्ता, इथे वयाचा कुठे प्रश्नच ये नाही. तुला कविता आवडल्या ह्यातच सर्व आले.