Wednesday, June 24, 2009

हायसे करावे ? ( गझल )





तुला वाटते मी तसे करावे ?
मला वाटते मी असे करावे !

असे का मला मालवून घ्यावे ?
असे काय माझे हंसे करावे ?

खुलासा मला ही दिला न कोणी
कि माझ्या सवे मी कसे करावे ?

असा का न ठोसा लगावु त्याला
कि ठोकून त्याचे ठसे करावे ?

मला वाटलेही तरी असे कां?
अता मीच का हायसे करावे ?

सुरेश पेठे
२५ जून ०९





Monday, June 8, 2009

तूं तरीही ! ( गझल )

ओळीखले ?नव्हते, बालीश तूं तरीही
आलो नजीक तेव्हा गेलीस तूं तरीहि
.
जाशील तूं कधीही, चिंतेत रात गेली
ना एकरूप झालो, होतीस तूं तरीही
.
सांगून जावयाचे होतेस तूं मलाही
काहीच का नसे म्हणालीस तूं तरीही
.
आळीव राग मी रे ऐकावयास येतो
ऐकू न ये असे ? गाईलीस तूं तरीही
.
माझ्या मनात राही कांटा सले मलाही
चालेलना मनी राहीलीस तूं तरीही
.


सुरेश पेठे
८जून०९
[ ह्यातील दुसरा शेर श्री अरविंदजीं नी दिलेला आहे. त्याला गुंफून ही गझल लिहीली आहे. ]

Friday, June 5, 2009

डोकावणार आहे ! ( गझल )


वेगा सवे मनाच्या मी धावणार आहे
जाते कुठे कुठे ते मी पाहणार आहे

वेगात धावलो मी पाडाल का मलाही ?
काही मला तरीही ना लागणार आहे

लागावया मलाही, घालाल पाय मध्ये
पायात दोन ही बेड्या ठोकणार आहे

मार्गात धावणाऱ्या श्वानास काय पाहू
श्वानास त्या सर्वथा मी चावणार आहे ?

पाहू जरी कुठे, काही दीसणार नाही
माझ्यामनी मनाच्या डोकावणार आहे

सुरेश पेठे
५ जुन ०९

( वरील मतला , गजल परिचयाच्या दिवशी दिला होता पण गझल आज पुरी होतेय असे वाटते श्री भूषणजी व श्री अजय जींनी मान्य केली तर !)