Sunday, January 25, 2009

नको ओझे जाताना !


नको ओझे जाताना !

आज त्या घटनेला महिना झाला असेल 
कोण जाणे वर्ष ही उलटेल   
पुढील वर्षे मोजली तरी जातील का ?

कोण्या एका क्षणी, कोणी एक भेटते, हृदयी बैसते !
काहीतरी फसते, हृदय रिकामे हॊते !
खरंच?  हृदय रिकामे हॊते ....पोकळी करून......की घर करून ?

पोकळी कशाला म्हणतात?...... म्हणजे मोकळी जागा ?
कुठे असते ती पोकळी की मोकळी ?  हृदयात......मनात ....?

तसं तर आयुष्य हीच एक मोठ्ठी पोकळी, एकदम आगळी !
काय काय भरले आहे त्यात ? काय रहाते काय जाते ?.....

भरते म्हणजे तरी काय ? वस्तू आहे दाखवायला ?
वेळ कुणाला बघायला? जो तो आपल्याच धुंदीत, बेहोषीत !....

कधीतरी ... होते भेटणे ! वाटते भरले सगळे जणूं !
माववायला नसे जागा एकही आता अणू- रेणू !

क्षण एक पुरे पण त्याला..... रिता व्हायला !
वेळ नसे विचार ही करण्या !

आता ?...

पण नाही ही तर ’ त्याची ’ योजना ! उगाचंच कशाला कमर वांकवायला ?
नको ओझे जाताना !

सुरेश पेठे
२६जाने०९






 



Wednesday, January 21, 2009

जवळलेस कशाला ?



भेटावयाचे नव्हते ना ?
खुणावलेस कशाला?

बघायचे नव्हते ना?
नेत्रकटाक्ष कशाला ?

हसविण्या साठी मला
रडविलेस कशाला?

जिंकायचे होते तुला
हरविलेस कशाला ?

तोडायचे होते तुला
जवळलेस कशाला ?


सुरेश पेठे
२१ जानेवारी २००९

Monday, January 19, 2009

मित्रत्वाची ऐशीतैशी ( ऑर्कुटवरच्या )



ऑर्कुट वरची तूं तरी खरी आहेस का गं ?
किती जरी घेतला शोध काढला होता मागं!
पोहोचूं का ठरल्या ठिकाणी? मला आता सांग
नाहीतर कोणी उगा, धरतील राग राग ! ..... ( १ )

कळले इथले सारे, एकूणच ना बेगडी
नातीगोतीं चा मामला एक्मेकां वर कडी
प्रोफाईल असते फक्त खोट्या माहीती साठी
कोणी करती कवतिक, म्हणे मित्रत्व जोडी ! ..... ( २ )

मित्रत्वाची ऐशीतैशी ते तरी खरे असशी ?
नातीगोतींचा गोतवळा काका ताई मावशी
नावां पासून साऱ्यांना वेगळाले घडविशी !
जो तो राहात असतो स्वत:लाच फसविशी ......... ( ३ )

"नात्यांची वीण घट्ट करुच नये.." अगदि
"कुठलच नात तितकसं जपुच नये.." कधी
कोणी तरी जेव्हा म्हटले, मनी ठसला हा मंत्र
एकदम पटला रे , कायम चा कानमंत्र ........ ( ४ )

सातासमुद्रा पल्याड बनला मित्र क्षणात
खरे ना ? आमचे होती तुकडे एका घणात !
कालपावेतो सगळे बागडले अंगणात
गैर-समजातून की हो झाली वाताहत ! ........ ( ५ )



( वरील चवथ्या कडव्यातील दोन ओळी सुप्रिया पाटिल च्या " मित्रत्व " ह्या कवितेतून घेत आहे.)

सुरेश पेठे
१९ जानेवारी २००९

Sunday, January 18, 2009

संक्रांत महिमा

संक्रांत म्हणजे सण, प्रेम वृध्दींगताचा
पूर्व संध्येस भ्रमनिरास झाला त्याचा !

स्निग्धता अति घसरण्यासच मदत करी
अति गूळाची गोडी, अगोड पणे साथ देई !

तिळा देत असता, तिळमात्र प्रेम नाही
गुळाचा चिकटपणा पण सुटतच नाही !

मनासारखे आजपावेतो कोणास मिळाले ?
नेमेचि येतसे संक्रांत, तो त्यां वर भाळे !

रूढी प्रिय मानव चिकटून त्यास राही
काळाचा महिमा, पण लक्षात कोण घेई ?

सुरेश पेठे
१४ जानेवारी २००९

मी कोण ? आहेस कसा ?



स्वत:ला विचारले मी , मी कोण ? आहेस कसा ?
उत्तर नाहीच आले , ऐकल्या टाळ्या व हंश्या

मी तर बावळटसा , खिजगणतीत कसा ?
कुत्सितसे पाहूनच , पळला धूम ससा

सागराला विचारले , कुठे आहे रे किनारा ?
खळाळतच म्हणतो , तुम्ही प्रथम मला दिसा !

आकाशी सुध्दा नगण्य , शोधे अग्रगण्य NASA
विचारतॊ कोण तुम्हा , कुठे असा किवा नसा !

भिकारीही पळतोय , पाहून रिकामा खिसा
तुम्हा कुठे कशी जागा , कसे म्हणतील बसा ?

कोणासही काही नाही , तुम्ही रडा भेका रुसा
बळी तोच कान पिळी , नियम जगाचा असा

तू तर रे क:पदार्थ , कोपऱ्यातच ना बसा
मी निरोप घेण्या आलो , कोणा वेळ इवलासा ?

'तू' तरी यावेस ना ? तू ही घेतलास वसा !
उमटत नाही ठसा , त्यासी न्याय जगी खासा !!

सुरेश पेठे
३१ डिसेंबर २००८